Saturday, July 25, 2009

ती मैत्री म्हणजे फक्त

एक एक दगड मोलाचा
तोच दगड नदीचा,नाल्याचा
कधी डोंगरावरचा,कधी पाण्याखालचा
पण माणुस हा कवडीमोलाचा....!
ना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत
असाच मनी तो सदा अशांत अशांत...
अशात एक हात मैत्रीचा
बनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा
मैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही
त्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही
जो ही दगड उचलला
एक माणुस दबला दिसतो
कधी स्वार्थाचा,कधी परमार्थाचा
म्हणुन प्रत्येक दगडाखाली
मित्र भेटत नाही...
मैत्रीचा रंग कसा हा
दगडाचा रंग जसा हा
उन वारा पाऊस कधीच
काहिच त्याचे बिघडवत नाही
तो तसाच आसतो सदा
जसा असतो आधी तसा
म्हणुन प्रत्येक दगडाचा रंग
काळा असत नाही...
काळा असला तरी
काळाच्या पाण्याने पांढरा होत नाही
तशीच असते ही मैत्री..!
काळ कितीही बदलला
तरी ती बदलत नाही
आणि जर बदलली तर...
ती मैत्री म्हणजे फक्त
दगडांची...
माणसांची होत नाही.....

-- सतिश चौधरी

Friday, July 17, 2009

" हो सजनी..."


माझा पहिला मराठी प्रेमगीतांचा अल्बम...
" हो सजनी..."
ज्यात मी गीत-संगीत दिलय... लवकरच येत आहे...

फटाकडी....!!

राखी तुह्या नशीबी
आहे भाग्याचे निळे पाणी
पोट्टे लागले तुह्यामागे
लग्नाले घाले मागणी...

वारे.! पोट्टे सुटले आता
गाती राखीच्या ते गाथा
कोण्या पोट्याने तिले विचारलं
तुह्या भुत.. काळ कसा व्हता
भुत शिरला तिच्यामंधी
मारी त्याले ती लाथा...

च्यायला अभिषेक कोणी
म्हणे तिचा मुलगामित्र(बॉयफ्रेंड)व्हता
अभिचा झाला अभिरगुलाल
अन् तिने त्याचा शेक केला व्हता

अशी काय हि बया
कोण जाणे कोनाले भेटिन
भेटिन कि नाही माहित नाय
पन कोणाले ती कापीन...

राजकुमार जणु सारे
ह्या स्वयंवरातले भारी
गुपचुप राहायचं शिकले सारे
नायतर बया हि थोबाडी मारी

कोण जाणे पुढे व्हते काय
कोंबडा(मुर्गा)कोणता ओरडतो
बाग देतो पहाटेची
कि वाचवा वाचवा म्हणतो...

काय बी म्हना रियालिटीची
धुम आली सगळीकडे
लग्नबी हे शो नसावं
एवढच मले वाटे...

बाकि काय जो बी कोंबडा
फसन तो काही
बाग देणार नाही...
कोंबडी आहे कि फटाकडी
हे त्याले बी कळनार नाही....

--- सतिश चौधरी

Tuesday, July 14, 2009

मन ओलाविले....

मन ओलाविले तुझ्या प्रेमाने
ओलावील्या राता...
तुझ्या प्रितीचे चांदणे घेऊन
शिंपीत ये आता ....

तुझे लाजणे हळवा पाऊस
तुझे पाहणे नटखट वारा
गाल गुलाबी झाले तुझे
रागावुन सांगत जाई आता
हि एक प्रेम गाथा.... १

मन हे माझे चालत गेले
तुज्या प्रितीच्या प्रेम वाटा
कसला हा बंध आहे तुझ्याशी
कळे ना मजला कसले हे नाते
जणु रेशीमगाठा....२

-- सतिश चौधरी

Monday, July 13, 2009

मलाच माहित कसा जातो मी रंगुन...

मनाच्या कोऱ्या पानांमध्ये
जपुन ठेवलयं तुला फुल म्हणुन...
जरी कोमेजलयं ते
म्हणुन काय झालं...
त्याचा सुगंध दरवळतोय अजुन...

तुझी प्रत्येक आठवण
आहे मनात अशी..
जशी एखाद्या मंदिरी
घंटा वाजत आहे
तिचा सुर ऐकतोय मी दुरून...

संथ पाण्यामध्ये
जसा कुणी दगड फेकावा
तशी तुझी आठवण
उठते ह्या मनात अशी
अन् तशीच तरंगत जाते लहर बनुन...

ना फुल ,ना घंटा ,ना तरंग
कुणीच नाही सांगु शकत
तुझ्या आठवणींचा कसा हा रंग
ते तर फक्त मीच जाणतो
मलाच माहित कसा जातो मी रंगुन...

-- सतिश चौधरी

Friday, July 10, 2009

अन् माई यंदातरी पोट भरु दे .....तुह्या लेकरांचं...

मांगल्या वर्षी लइ
सोय तुही केली
राबलो ऊन्हीतान्ही
चिखलामंधी नाचलो मी
माह्या बापही तवा
लइ बेरहम झाला
त्यानबी इतकुसाच घास दिला
काही दिवस बरसला
अन् तसाच निघुन गेला
पन ...माई तवाबी
तुइच माया लागली
थोडिकसी का व्हयेना
माई जवारी तेवढी पिकली
पन यंदा काय व्हते
कोनाले माहित...
यंदा बी माह्या बाप
रागवुन हाय माह्यावर...
भागवुन देतो थोडिसी तहान
अन् मंग मध्येच
मले इसरुन जातो
मांगल्या वर्षी माही पोरं
अर्ध्यापोटीच राह्यची
यंदातरी त्याइले
पोटभरुन जेवु दे...
जसी मले माह्या
लेकरायची चिंता
तसी तुलेबी आहे माई...
आनखी काय बी नाइ
मांगत तुले..
माह्या डोकस्यावरती छत राहु दे..
तुह्या मायेचं...
अन् माई यंदातरी पोट भरु दे
तुह्या लेकरांचं...


-- सतिश चौधरी