Tuesday, September 29, 2009

हुप हुप करती माकडं....

हुप हुप करती माकडं
होतील हलाल एक एक
आता सारी बोकडं...
काय हाय सीधं
अन् काय वाकडं...

पुन्हा येतील बे बे करीत
बकरींसारखी जनतेपुढं...
निवडणुका आल्या आता
कुत्री भुंकतील गल्लोगल्ली
बाटली फुटेल अन्
कटेल बिचारं निष्पाप कोंबडं...

सगळे हरामी चोर सारे
हातात घेवुन हात आता
दाखवतील बघा हातवारे
सत्तेसाठी कायबी करतील
इतरांचा पायजामा...
अन् स्वत:ची चड्डी सोडतील...
भोळ्याभाबड्या जनतेच्या
पाठीवरती जो तो
भाजेल बघा हो पापडं.....

विलासराव ,अशोकराव
शिंदे ,नारायण..
पवार ,आबा,भुजबळ मुंडे
दोन दोन ठाकरे
घेतील जीव मराठीचा
नाहिच जमलं तर बनतील गुंडे...
वा रे आमची लोकशाही
अन् वा रे आमची
मराठी माय...
जो तो बनु पाहतो बाप
पन् पोरं अजुनी
अनाथ हाय....
कुणीतरी खरचं बनेल का गाय
म्हणेल का कुणीतरी आता
कि माझचं हाय हे बछडं....
कि माझचं हाय हे बछडं....

-- सतिश चौधरी

Sunday, September 27, 2009

आज पुन्हा...!!

आयुष्याच्या ह्या वळणावरती
वाट चुकतेय आज पुन्हा
कसले दडपण ह्या मनावरती
काहीतरी चुकून घडतोय गुन्हा
तुझ्या आठवणींचा पाऊस
अजुनही संपला नाही...
श्रावणाचे असती चार महिने
तरसुन बरसून निघुन तो जातो
पण तुझा पाऊस तसाच
अजुनही थांबला नाही...
थेंब न थेंब एक एक आठवण
अधुनमधून सरींसारखी
मनी ओलावा देऊन जाते
भिजवुन जाते पुन्हा पुन्हा.....

निघुन तर गेली तु सुखरुप
मन हे तिथेच राहुन गेले
प्रवास तर केला मी पुढे पुढे...
शरीराने अन् वयाने...
मन मात्र तिथेच थांबुन गेले...
तुच म्हटले होतेस ना
जिवन कधिही थांबत नाही
वचनही माझ्याचकडून घेतले होतेस तु
कि चालत राहशील ह्या वाटेवर
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती
वळण देशील तुझ्या मना...
मलाही वाटतयं ...आता चालावं
पुन्हा एकदा जीवन बहरावं
पण भितीही तुझ्याचमुळे ह्या मनाला
कि उभरुन येईल घाव जुना...पुन्हा...

वाटे नको ते क्षितिज
नको ती भुरळ...
किती छेडिले आजवर स्वत:ला
मीच मारीले माझ्या मनाला...
तुझ्या क्रुपेमुळे...
अन् तु ... तुला तर काही
माहीतही नसेल...
इथे सतत वणवा पेटला
तुला तर त्याची जाणही नसेल...
पण आजवर जे झाले
ते खुप जाहले..
आज पुन्हा मन जागं होतयं...
कुणासाठीतरी....
पहिल्यांदा तुला विसरुन...
अंकुर फुटतोय ह्या मनाला
तुझ्या नावाचं झाड पडुन...
जे सोसलं आजवर
ते विसरायचं मला...
मनाला सोबत घेऊन
चालायचं एका नव्या वाटेला....
बेधुंद आज पुन्हा हे मन
होतयं कुणासाठीतरी...
ना अडवायचं आता त्याला...
जगवायचं मला माझ्या मनाला...
आज पुन्हा.... आज पुन्हा...

--- सतिश चौधरी

Friday, September 4, 2009

तु असती तर....!

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...

तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...

-- सतिश चौधरी