Wednesday, November 25, 2009

नवी पहाट.. नविन वाट

नवी पहाट.. नविन वाट
मनाला नवे पंख फुटले
निश्चय आहे एक असा
रणशिंग आज नवे फुंकले
घोड्याच्या टाचांनी कधी
खिळ्यांचे ठोके आठवायचे नाही
मनीचा घोडा टपटप धावे
आता त्याला अडवायचे नाही...

एक ध्ये य घेऊनी मनात आज
निघालोय एकलाच
पुढे पूढे जाताना मागे
वळुन आता बघायचे नाही
रस्त्यामध्ये कधी खड्डे असतील
काचा फुटतील काटे रुततील
माथा गर गरेल लाथा बसतील
तरिही मागे हटायचे नाही...

उदयाची पहाट कशी असेल
रात्रच फक्त ते जाणते
मी फक्त पहाटेची
नुसती वाट पाहु शकतो
अंधाऱ्या रात्रीत काळोख अंधारलेला
उजेडाची वाट पाहु शकतो
तांबड फुटेल कोंबडं ओरडेल
आता कधीच उशीरा उठायचं नाही

-- सतिश चौधरी

दुर दूर तु....

दुर दूर तु आहे तरी , राही ह्या मनी
बोलाविते मज आज कुणी हळुच त्या क्षणी
रजनीगंधा सजनी माझी....

मोरपीस ते तु दिलेलं
जपुन ठेवलयं मी
गुलाबफुल त्या पानांमध्ये
लपुन ठेवलयं मी
तु गेली जरी अशी सोडुनी तरी त्या आठवणी
छेडीत जाती पुन्हा मग हळुच ती गाणी...
रजनीगंधा सजनी माझी....

रोज करतो विचार हा
विसरुन जावं मी
ह्या जगण्याला अर्थ कसला
मरुन जावं मी
पण जातानासुद्धा ती शपथ गेली तु देऊनी
मरण्यासाठी क्षणोक्षणी मज गेली तु सोडुनी
रजनीगंधा सजनी माझी....

--सतिश चौधरी

Tuesday, November 10, 2009

जय मराठी...

जय मराठी….

मराठी रंग मराठी गंध
मायभुमीचा ओला सुगंध
मिसळत आहे पसरत आहे
मराठी बाणा जागवत आहे
स्वराज्य पुन्हा मागत आहे
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...

शिवरायांची किर्ती त्यांच्या
अंगात पुन्हा सळसळते
मायबोली मराठी पुन्हा
गीत स्वराज्याचे गाते
एकच सुर निघत आहे ...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


कोंकणी ऐरणी पुणेरी वर्हाडी
आमची हि मायबोली
क्रुष्णा कावेरी वर्धा नर्मदा
आणि ती गोदावरी
एका धारेत मिसळत आहे
हा मराठी माणुस जागत आहे....
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


ना धर्माचा ना जातीचा
जो मानतो स्वत:ला ह्या मातीचा
जो जगतो मराठी तो मराठी
जो बोलतो मराठी तो मराठी
हा मराठी धर्म पसरत आहे ....
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


द्म्यानदेव माऊली अन् तुकोबांच्या
अभंगात जन्मली ती मराठी
पु.लं पासुन कुसुमाग्रजांच्या
लेखनीत सजली ती मराठी
हा मराठी झेंडा फडकत आहे...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


भिमरायांच्या त्या क्रांतीमध्ये
पेटून उठली ती मराठी
जोतिबांच्या शिकवणीमध्ये
अस्मिता जागली ती मराठी
हा मावळा मराठी पेटत आहे...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


एकसंग असावे एकबंध असावे
हे मराठी नाते मनोमनी रुजावे
ह्या भारतमातेच्या लेकरांमध्ये
ह्या महाराष्ट्राचे अव्वल स्थान असावे
ह्या सतिशाला हे वाटत आहे ....
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात हि माती
जय मराठी...जय मराठी...


-- सतिश चौधरी

वाट पाहतो मी

वाट पाहतो मी चंद्र नभीचा
आसुसलेला तुझ्या प्रेमाचा
करतो अशी आर्त विनवणी
बनना तु माझी चांदणी...

रोज येते स्वप्नांमध्ये
येना आता जीवनामध्ये
एक एक क्षण तुझी आठवण
उजळत जाते माझ्या मनी...
बनना तु माझी चांदणी...

सागर माझा तु प्रितीचा
मी किनारा वेड्या मनाचा
मीच किनारी वाट पाहतो
लाट येईल माझी होऊनी...
बनना तु माझी चांदणी...

दाही दिशांना चाहुल लागली
माझ्या मनाला पंख ही फुटली...
उडत जाईल फिरत राहिल
तुझ्या प्रेमाच्या मी गगनी....
बनना तु माझी चांदणी...

-- सतिश चौधरी

आयला तिच्या मायला…….

आयला तिच्या मायला
ह्या पोरी काऊन अशा
पोट्टे लेकाचे मागे त्यांच्या
लागे घेऊन हाती मिशा
सगळंकाही पोरं आताची
विकुन टाके त्यांच्यासाठी
पन् पोरिंना घाम काही
कधीच आला नाही...

पोट्टं म्हणे पोट्टीले
मले तु आवडतेस
तशी लई भारी...
अदा तुझी मिरची जशी
आहे अलग न्यारी...
आयला तिच्या मायला
पोट्टी फक्त हसून जाते
हसली म्हंजे फसली
पोट्ट्याची झोप उडून जाते...

अचानक पोट्टी त्याले
भलत्याच सोबत दिसते
हसत हसत पोट्टी सांगते
हा माह्या नवरा होनार म्हंते
आयला तिच्या मायला
पोट्ट्याले काहीच समजत नसते
दारु प्यायची म्हनतो लई
पन् त्याचदिवसी ड्राय डे असते...

आयला तिच्या मायला
त्याले राग भलता येतो
ह्या पोरी काऊन अशा
त्याले प्रश्न असा पडतो
म्हने ह्यांच्यापायी आमचे
खिशे कधीच फाटुन गेले
सिनेमाची तिकीटं अन्...
रेस्टॉरेंटची बिल राहुन गेले..

काय करावं कळेना आता
ह्या पोरींचा जुना फंडा
मिठासोबत जखमांवरती
मारेल फेकुन अंडा...
चायला तिच्या मायला
पोट्ट्याच्या मनात सदा येई
शिव्याशाप देई तिले...
म्हने तुही दुनिया जळुन जाई...

पन् काय करावं पोट्ट्यांचे
मन लयच भावनीक असते
पोट्टी कधीच इसरुन जाते..
पन् तो तिले आठवत बसते
कितीही म्हटलं तरी त्याची
तिले हाय लागत नाही
कारण प्रेम असतं.....
च्यामायला त्याचं तिच्यावर
म्हनतो.... जा सदा सुखी रहा...
दुसरं काही मागत नाही...
दुसरं काही मागत नाही...
--- सतिश चौधरी

हे... कसले बंध

हे... कसले बंध
मला ना कळले तुला ना कळले
प्रेमाचे हे रंग..
हे... असले बंध
मनाला कळले मनाला जुळले
प्रेमाचे हे रंग..

चैन नाही आता रात्रंदिन
मन ही गेले हे हरवुन
तु.. माझी प्रिया
झाली माझी दुनिया

हात तुझा मी गेतला हाती
शतजन्मांची ही जुळली नाती
तु.. दिला मजला
जगण्याला अर्थ नवा

हे... कसले बंध
मला ना कळले तुला ना कळले
प्रेमाचे हे रंग..
हे... असले बंध
मनाला कळले मनाला जुळले
प्रेमाचे हे रंग..

-- सतिश चौधरी