आली राम्याची बायको
माहेरचा फंडा घेऊन
खाते नवऱ्याचे दणके
सासुवर काढते फणके…..
आहे डोक्याने सायको
मारेल अंडा फेकून
लावे ओठांना चमकी
नवऱ्याला देते धमकी….
आली राम्याची बायको
हॉरर सिनेमा पाहून
भिती सासूला दाखवे
सासरा स्वत:ला चकवे….
आली राम्याची बायको
शिकून डांस डिस्को
कशी नवऱ्याला नाचवी
मोहल्ला दाढी खुजवी…..
आली राम्याची बायको
घेऊन अंगी भवानी
घाले लोटांगण घरा
राम्याच्या डोळ्यात पाणि…..
कवि - सतिश चौधरी
Wednesday, April 29, 2009
किरण....
किरण जीवन सुर्याचा
पडताच अंगावर
देहात येते स्फुर्तिची
जगण्याची नवी बहर...
किरण जीवन आशेचा
पडताच मनावर
मंदिरी घंटा वाजे
जिंकण्याचा होतो गजर...
किरण जीवन मात्रुत्वाचा
पडताच उदरावर
अंगात होते वात्सल्याची
ममतेची नवी प्रहर...
किरण विश्वास अम्रुताचा
येताच मनाच्या शैय्येवर
जिवंत करते मर्त्य मनाला
पिऊन नैराश्येचा जहर..
किरण डुबत्या संध्येचा
पुन्हा पडताच अंगावर
आठवणींचे बाळ झुलते
प्रेमाच्या झुलत्या पाळण्यावर...
कवि - सतिश चौधरी
पडताच अंगावर
देहात येते स्फुर्तिची
जगण्याची नवी बहर...
किरण जीवन आशेचा
पडताच मनावर
मंदिरी घंटा वाजे
जिंकण्याचा होतो गजर...
किरण जीवन मात्रुत्वाचा
पडताच उदरावर
अंगात होते वात्सल्याची
ममतेची नवी प्रहर...
किरण विश्वास अम्रुताचा
येताच मनाच्या शैय्येवर
जिवंत करते मर्त्य मनाला
पिऊन नैराश्येचा जहर..
किरण डुबत्या संध्येचा
पुन्हा पडताच अंगावर
आठवणींचे बाळ झुलते
प्रेमाच्या झुलत्या पाळण्यावर...
कवि - सतिश चौधरी
हुंदाळी धुंदाऴी...
हुंदाळी धुंदाऴी हि मराठी पोरगी
मन गेलिया चोरुनी हि मराठी पोरगी
पायात जोर नाहि खेळे हि लंगडी
अन् जिवलागी ….मन जिवलागी….
एरंड्याचं गुर्हाळं जशी हि पोरगी...
मनं बासंदी तिचं पण अंगाने डाळंबी...
आवाज तिचा हो फुटक्या ढोलावाणी
पण जिवलागी… मन जिवलागी.....
नखरे तिचे हो आहे दसनंबरी
उष्ट्या हातानेच कावळा हो मारी
हातात जोर तिच्या मूंगीचा हो भारी
अन् जिवलागी … मन जिवलागी..
टिंगाळी करीते मुलांची टिंगाळी
पळुनी जाती हो शहाणी मुलं सारी
तरीपण वाटे ती तिखट मिरची भारी
अन् जिवलागी … मन जिवलागी
कवि:- सतिश चौधरी
मन गेलिया चोरुनी हि मराठी पोरगी
पायात जोर नाहि खेळे हि लंगडी
अन् जिवलागी ….मन जिवलागी….
एरंड्याचं गुर्हाळं जशी हि पोरगी...
मनं बासंदी तिचं पण अंगाने डाळंबी...
आवाज तिचा हो फुटक्या ढोलावाणी
पण जिवलागी… मन जिवलागी.....
नखरे तिचे हो आहे दसनंबरी
उष्ट्या हातानेच कावळा हो मारी
हातात जोर तिच्या मूंगीचा हो भारी
अन् जिवलागी … मन जिवलागी..
टिंगाळी करीते मुलांची टिंगाळी
पळुनी जाती हो शहाणी मुलं सारी
तरीपण वाटे ती तिखट मिरची भारी
अन् जिवलागी … मन जिवलागी
कवि:- सतिश चौधरी
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मी हि ताजमहल
तुझ्यासाठी बांधीला असता
अन् त्यासाठी कुणाचा
बळी घेतला असता ....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मजनू बनून मी ही
झालो असतो वेडा
दगड मारले असते मलाही लोकांनी
अन् मग तु मध्ये आली असती...
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मी पण केले असते सर
शिखर उत्तुंग पर्वतांचे, तुझ्या प्रेमासाठी
मी पण बांधले असते घर
सागराच्या उसळणाऱ्या लाटांवरती ...
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
चिंबचिंब भिजलो असतो
मी हि तुझ्यासोबत पहिल्या पावसामध्ये
ओल्या वाळूंवरती मग मी ही
तुझे नाव लिहिले असते…..
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मी ही तुझ्यासाठी चंद्रतारे आणिले असते
तुझ्या प्रकाशासमोर सगळे
मग मंद मंद वाटले असते…..
गुलाबाची ना सही
झेंडुची फुले मी हि दिली असती
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
एक एक करुन क्षण सगळे
मी हि मोजले असते तुझ्यासाठी…
माझ्या अंगणात येण्याऐवजी
माझ्या अंगणातून जाताना
तुझी वरात मी हि पहाली असती ..
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
हसत हसत डोळे पुसत
मग स्वत:शीच म्हणलो असतो
तु करण्यापेक्षा स्वत:चीच
थट्टा मी केली असती तर.....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
कवि:- सतिश चौधरी
तुझ्यासाठी बांधीला असता
अन् त्यासाठी कुणाचा
बळी घेतला असता ....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मजनू बनून मी ही
झालो असतो वेडा
दगड मारले असते मलाही लोकांनी
अन् मग तु मध्ये आली असती...
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मी पण केले असते सर
शिखर उत्तुंग पर्वतांचे, तुझ्या प्रेमासाठी
मी पण बांधले असते घर
सागराच्या उसळणाऱ्या लाटांवरती ...
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
चिंबचिंब भिजलो असतो
मी हि तुझ्यासोबत पहिल्या पावसामध्ये
ओल्या वाळूंवरती मग मी ही
तुझे नाव लिहिले असते…..
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
मी ही तुझ्यासाठी चंद्रतारे आणिले असते
तुझ्या प्रकाशासमोर सगळे
मग मंद मंद वाटले असते…..
गुलाबाची ना सही
झेंडुची फुले मी हि दिली असती
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
एक एक करुन क्षण सगळे
मी हि मोजले असते तुझ्यासाठी…
माझ्या अंगणात येण्याऐवजी
माझ्या अंगणातून जाताना
तुझी वरात मी हि पहाली असती ..
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
हसत हसत डोळे पुसत
मग स्वत:शीच म्हणलो असतो
तु करण्यापेक्षा स्वत:चीच
थट्टा मी केली असती तर.....
पण...तु म्हणतेस म्हणून नाही...!
कवि:- सतिश चौधरी
Subscribe to:
Posts (Atom)