Wednesday, May 26, 2010

तुच सांग तुझ्याविना.....कसा मी राहु...

अशाच एखाद्या वळणावरती
भेट कुठेतरी…
सांज माझी सुनी सुनी
बनव तिला तु सोनेरी...

स्वप्नामध्ये माझ्या
ये तु कधीतरी…
माझी म्हणुनच ये
नको आता ती परी...

किती वाट पाहु तुझी
अन् किती नाही…
वाट चुकल्यासारखी तरी
ये माझ्या घरी...

तुझ्याविना ह्या जिवनाला
अर्थ कुठं आहे...
तुच खरी माझी
बाकी सगळं खोटं आहे

ये एकदा तरी ये आता
नको अंत पाहु...
तुच सांग तुझ्याविना
कसा मी राहु...
कसा मी राहु...

--- सतिश चौधरी

Monday, May 24, 2010

तु धरती माझी अंबर मी तुझा....

तु धरती माझी अंबर मी तुझा
सागर मी असा अर्धा अधुरा
नदी बनुनी ये माझ्या जीवनात
मी आहे अशांत तुझ्या प्रेमात
आसुसलेला हा तुझ्या प्रेमाचा....
तु धरती माझी अंबर मी तुझा…

रात्रंदिनी अशी तु राहते मनात
पायलांची झनकार घुमते कानात
डोळ्यांत बसुन उडते तु भुर्रकुन
पाखरु हे मनाचे उडे गगनात
मी पोपट हा माझ्या मैनेचा....
तु धरती माझी अंबर मी तुझा….

हे सावल्यांचे नाते आहे उन्हांत
ओठांवरती अलगद गाणे प्रेमात
तु आहे माझ्या मनात अशी
जळत्या उन्हात शितल सावली
गारवा दे मजला तुझ्या प्रितीचा...
तु धरती माझी अंबर मी तुझा….


-- सतिश चौधरी