Wednesday, November 25, 2009

नवी पहाट.. नविन वाट

नवी पहाट.. नविन वाट
मनाला नवे पंख फुटले
निश्चय आहे एक असा
रणशिंग आज नवे फुंकले
घोड्याच्या टाचांनी कधी
खिळ्यांचे ठोके आठवायचे नाही
मनीचा घोडा टपटप धावे
आता त्याला अडवायचे नाही...

एक ध्ये य घेऊनी मनात आज
निघालोय एकलाच
पुढे पूढे जाताना मागे
वळुन आता बघायचे नाही
रस्त्यामध्ये कधी खड्डे असतील
काचा फुटतील काटे रुततील
माथा गर गरेल लाथा बसतील
तरिही मागे हटायचे नाही...

उदयाची पहाट कशी असेल
रात्रच फक्त ते जाणते
मी फक्त पहाटेची
नुसती वाट पाहु शकतो
अंधाऱ्या रात्रीत काळोख अंधारलेला
उजेडाची वाट पाहु शकतो
तांबड फुटेल कोंबडं ओरडेल
आता कधीच उशीरा उठायचं नाही

-- सतिश चौधरी

No comments:

Post a Comment