Saturday, July 25, 2009

ती मैत्री म्हणजे फक्त

एक एक दगड मोलाचा
तोच दगड नदीचा,नाल्याचा
कधी डोंगरावरचा,कधी पाण्याखालचा
पण माणुस हा कवडीमोलाचा....!
ना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत
असाच मनी तो सदा अशांत अशांत...
अशात एक हात मैत्रीचा
बनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा
मैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही
त्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही
जो ही दगड उचलला
एक माणुस दबला दिसतो
कधी स्वार्थाचा,कधी परमार्थाचा
म्हणुन प्रत्येक दगडाखाली
मित्र भेटत नाही...
मैत्रीचा रंग कसा हा
दगडाचा रंग जसा हा
उन वारा पाऊस कधीच
काहिच त्याचे बिघडवत नाही
तो तसाच आसतो सदा
जसा असतो आधी तसा
म्हणुन प्रत्येक दगडाचा रंग
काळा असत नाही...
काळा असला तरी
काळाच्या पाण्याने पांढरा होत नाही
तशीच असते ही मैत्री..!
काळ कितीही बदलला
तरी ती बदलत नाही
आणि जर बदलली तर...
ती मैत्री म्हणजे फक्त
दगडांची...
माणसांची होत नाही.....

-- सतिश चौधरी

No comments:

Post a Comment