Friday, July 10, 2009

अन् माई यंदातरी पोट भरु दे .....तुह्या लेकरांचं...

मांगल्या वर्षी लइ
सोय तुही केली
राबलो ऊन्हीतान्ही
चिखलामंधी नाचलो मी
माह्या बापही तवा
लइ बेरहम झाला
त्यानबी इतकुसाच घास दिला
काही दिवस बरसला
अन् तसाच निघुन गेला
पन ...माई तवाबी
तुइच माया लागली
थोडिकसी का व्हयेना
माई जवारी तेवढी पिकली
पन यंदा काय व्हते
कोनाले माहित...
यंदा बी माह्या बाप
रागवुन हाय माह्यावर...
भागवुन देतो थोडिसी तहान
अन् मंग मध्येच
मले इसरुन जातो
मांगल्या वर्षी माही पोरं
अर्ध्यापोटीच राह्यची
यंदातरी त्याइले
पोटभरुन जेवु दे...
जसी मले माह्या
लेकरायची चिंता
तसी तुलेबी आहे माई...
आनखी काय बी नाइ
मांगत तुले..
माह्या डोकस्यावरती छत राहु दे..
तुह्या मायेचं...
अन् माई यंदातरी पोट भरु दे
तुह्या लेकरांचं...


-- सतिश चौधरी

No comments:

Post a Comment