Monday, June 29, 2009

तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

दु:खाला घे प्रित मानुन
गा एक अबोध अश्रुगान
बिनशर्त प्रेम कर
ह्या जगण्यावर अनंत
जग जिंकुन घे तु सारे
असे कर्म कर कर्मठ होऊन
बनुन दाखव स्वत:ला
तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

होऊ दे आज आकाशी अशी
तुझ्या किर्तीची एक गर्जना
सुखाच्या ओल्या वाळुवरती
नाव तर सगळेच लिहतात स्वत:चे
पण दु:खाच्या काळ्या धोंड्यावरती
रुप दे तु तुझ्या मुर्तीचे
हरवु नकोस तु कधी स्वत:ला
तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

मागे वळुनी कधी बघणे नाही
बघितलेच तर कुठे थांबणे नाही
एक दु:ख जिथं शंभर सुख
मग फायदा कशात तुच जाण
म्हणुन दु:खाची साथ कधी सोडणे नाही
आयुष्य हे श्रापित वरदान आहे
श्राप समजुन दे वरदान स्वत:ला
बन... तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

-- सतिश चौधरी

Saturday, June 27, 2009

येरे येरे पिया...

येरे येरे पिया... येरे येरे पिया
माझे मन तुला पुकारे
देरे देरे पिया देरे देरे पिया
नयनांचे इशारे...

वाट तुझी ना मी पाहिली
आता जणु मुकी बाहुली
तुझी आठवण आहे आता
जळत्या उन्हात एक सावली...

प्रेम मी ही केले होते
पण वैरी जग हे झाले होते
तुझ्याचसाठी मी हे केले
आसवांना मी लपविले...

नाही धोका मी तुला दिला
धोका स्वत:शीच मी केला
तुच जाण तुझ्या वाचुन
काय असेल दुनिया माझी...

--सतिश चौधरी

Monday, June 22, 2009

पाकळी फुलली ....

पाकळी फुलली पाकळी फुलली
ओल्या ओठांची लाली हि खुलली ...|| ध्रु ||

सजनी तुझं स्मित पाहुनी
सुर्य बघ तो आडोशाला गेला
पाहुनी तुझी अंगडाई सजनी
मनात माझ्या धडकी भरली
पण बिचाऱया सुर्याची आभा
तुला जळूनी त्याच्यावर रुसली...

हे असे नको ते सजनी
नजरेचे बाण तु सोडले
माझ्या अन् त्याच्यावरही
मी तर तुझाच आहे प्रिये
पण त्याला कशाला
अशी ही भुरळ घालली...


इंद्र धनुष्याचे सारे रंग
आकाशी आज फिके वाटे
तुझ्या रुपाच्या गुलाबी थंडित
गारठलेले ते धुके वाटे
आकाशही आज ठेंगणे झाले
गोड हसण्याची अशी जादु जाहली...

-- सतिश

कोणाच्या पावलांचा .... येतो हा इशारा...

बे धुंद धुंद बे धुंद
आहे आज वारा
लाल मातीच्या कौलारी
घरट्याचा पसारा
कोणाच्या पावलांचा
येतो हा इशारा...

ध ड ध ड धा डा धुम
ध ड ध ड धा डा धुम
आकाशही घाबरलेले
पाहुनी विजांचा नजारा
कोणाच्या पावलांचा
येतो हा इशारा...

पान फुलं गाई गान
दवबिंदु घेई झोके
लटकलेले मोती जसे
ओल्या पानांचा सहारा
कोणाच्या पावलांचा
येतो हा इशारा...

-- सतिश

Saturday, June 20, 2009

बरसात...

बरसात...

जीवा लागे ओढ आता
माझ्या माहेरची रीत
बोले करडी हि माती
आली श्रावणाची प्रित...

जीवासंगे झुले आता
तुझ्या प्रितीचे हे गीत
पान फुलं पाहे आता
तुझ्या येण्याची हि वाट...

मनी ओलावा सुगंध
तुझ्या येण्याचा हा गंध
मन आभाळी वाटे
काळ्या ढगांचे हे बंध...

आज हरवले भान
जरी विजांचा कडकडाट
होईल आता इथे
आसवांची हलकी बरसात...

-- सतिश

Sunday, June 7, 2009

सजनी तुझ्यासाठी....

बालपणी तुझ्यासंगे
रंग मी खेळलो
नदिचा जसा किनारा
तुझ्या संग मी राहिलो
आठवणींच्या शिंपल्यांमध्ये
मैत्रिचा मोती मी जपला
प्रेम होतं माझं तुझ्यावर
पण नाही बोलु शकलो
सजनी तुझ्यासाठी....

रेशमांचे बंधन हे
कधी तुटू नये
प्रेमाच्या गुंतागुंतीत
मी कधी पडु नये
म्हणुन प्रत्येक वेळी
माझ्या नजरेची मी
संध्याकाळ केली
हळुच मावळु द्यायचो तिला
तुझी नजर उगवण्याआधी
सजनी तुझ्यासाठी...

अचानक जिवनात तुझ्या
एक पक्षी आला कोठून
पापण्याही माझ्या लागल्या नाही
अशी गेली तु त्याच्यासंगे उडून
मागे वळुनही तु पुन्हा
पाहले नाही प्रिये..!!
तिथेच उभा होतो मी
पण हाक नाही दिली तुला
सजनी तुझ्यासाठी...

हळुहळू दिवसामागुन
दिवस जात गेले
माझे श्रावण सगळे
उन्हात भाजुन गेले
पण.. आज तु अचानक
अशी बेरंग भेटली
काहिच नाही बोलली तु
नुसती धाडधाड रडली
आसवे नाही रोकले मी ही
सजनी तुझ्यासाठी...

पण.. आज आता पुन्हा
डोळे पुसायचे मजला
तुझे... नी माझे...
आज पुन्हा रंग
द्यायचे तुला...
खळाळुन हसण्याचे
मी तर कधीचा मेलो होतो
आज पुन्हा होश आला...
एकच मागणे मागत होतो
आज पुन्हा जगु दे मला
सजनी तुझ्यासाठी....

कवि - सतिश चौधरी

Saturday, June 6, 2009

गावठी मिठ्ठु...!!

एकदिवस शामा बुडा मुम्बईला गेला
थाटमाट पाहुन इथला चक्राऊन गेला
जशी गाडी थाबली तशी त्याची सुटका झाली
म्हणे चला आता एकदाची ही मुम्बई आली...

बापरे बाप म्हणे शामा बुडा बिल्डिंगा पाहुन
पडुन जायची टोपी त्याची पुन्हा वाकुन पाहुन
एवढी मोठि गर्दी पाहुन इथं बुडा गेला पिसाळुन
म्हणे एक कटिंग घ्यायची आता कुठतरी थांबुन...

कटिंग घेऊन बुडा आता निघाला रस्त्याने
रस्त्यांवरची वाहनं कशी पळती जोराने
इतक्यात बुड्याले आता अर्जंट कॉल आला
म्हणे आता कसं करु कुठे करू हा घोटाळा...

हळुच एकाठिकाणि बुडा रस्त्याच्या बाजु बसला
इतक्यात कोठुन न जाणे हवालदार तिथं आला
वो आबा काय सुरु म्हणुन प्रश्न त्याने केला
काही नाही साहेब म्हणुन धोतराने त्याला झाकला...

काहितरी गडबड म्हणुन हवालदार दाखव म्हणला
आबा म्हणे काही नाही एक गावठी मिठ्ठु आणला
म्हणे हात नका लाऊ त्याला तो उडुन जाईल
म्हणुन तर त्याला धोतरामधी लपुन मी ठेवला...

हवालदारास लई हौस लयच उतावीळ तो झाला
म्हणे आबा दाखवाच आता तो गावठी मिठ्ठु मला
मंग आबा म्हणे साहेब वरुनच हात लाऊन बघा
हा तर लयच नरम आहे तुम्ही मलेच ह्यो विका...

आबा म्हनतो असं व्हय मंग पिंजरा घेऊन या
तोपर्यंत थांबतो इथं मी ह्या मिठ्ठुला पकडुनिया
आलोच आता म्हणुन हवालदार पिंजरा आणण्या गेला
सुटलो एकदाचा म्हणुन बुडा तिथुनच गावी परतला...


कवि- सतिश चौधरी