Monday, June 29, 2009

तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

दु:खाला घे प्रित मानुन
गा एक अबोध अश्रुगान
बिनशर्त प्रेम कर
ह्या जगण्यावर अनंत
जग जिंकुन घे तु सारे
असे कर्म कर कर्मठ होऊन
बनुन दाखव स्वत:ला
तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

होऊ दे आज आकाशी अशी
तुझ्या किर्तीची एक गर्जना
सुखाच्या ओल्या वाळुवरती
नाव तर सगळेच लिहतात स्वत:चे
पण दु:खाच्या काळ्या धोंड्यावरती
रुप दे तु तुझ्या मुर्तीचे
हरवु नकोस तु कधी स्वत:ला
तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

मागे वळुनी कधी बघणे नाही
बघितलेच तर कुठे थांबणे नाही
एक दु:ख जिथं शंभर सुख
मग फायदा कशात तुच जाण
म्हणुन दु:खाची साथ कधी सोडणे नाही
आयुष्य हे श्रापित वरदान आहे
श्राप समजुन दे वरदान स्वत:ला
बन... तुझ्या जगाचा तुच सिकंदर...

-- सतिश चौधरी

No comments:

Post a Comment