Sunday, June 7, 2009

सजनी तुझ्यासाठी....

बालपणी तुझ्यासंगे
रंग मी खेळलो
नदिचा जसा किनारा
तुझ्या संग मी राहिलो
आठवणींच्या शिंपल्यांमध्ये
मैत्रिचा मोती मी जपला
प्रेम होतं माझं तुझ्यावर
पण नाही बोलु शकलो
सजनी तुझ्यासाठी....

रेशमांचे बंधन हे
कधी तुटू नये
प्रेमाच्या गुंतागुंतीत
मी कधी पडु नये
म्हणुन प्रत्येक वेळी
माझ्या नजरेची मी
संध्याकाळ केली
हळुच मावळु द्यायचो तिला
तुझी नजर उगवण्याआधी
सजनी तुझ्यासाठी...

अचानक जिवनात तुझ्या
एक पक्षी आला कोठून
पापण्याही माझ्या लागल्या नाही
अशी गेली तु त्याच्यासंगे उडून
मागे वळुनही तु पुन्हा
पाहले नाही प्रिये..!!
तिथेच उभा होतो मी
पण हाक नाही दिली तुला
सजनी तुझ्यासाठी...

हळुहळू दिवसामागुन
दिवस जात गेले
माझे श्रावण सगळे
उन्हात भाजुन गेले
पण.. आज तु अचानक
अशी बेरंग भेटली
काहिच नाही बोलली तु
नुसती धाडधाड रडली
आसवे नाही रोकले मी ही
सजनी तुझ्यासाठी...

पण.. आज आता पुन्हा
डोळे पुसायचे मजला
तुझे... नी माझे...
आज पुन्हा रंग
द्यायचे तुला...
खळाळुन हसण्याचे
मी तर कधीचा मेलो होतो
आज पुन्हा होश आला...
एकच मागणे मागत होतो
आज पुन्हा जगु दे मला
सजनी तुझ्यासाठी....

कवि - सतिश चौधरी

No comments:

Post a Comment