Tuesday, June 15, 2010

जय मनसे.....जय मनसे....

मराठी रंग मराठी गंध
मायभुमीचा ओला सुगंध
मिसळत आहे पसरत आहे
मराठी बाणा जागवत आहे
स्वराज्य पुन्हा मागत आहे
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे...जय मनसे..

शिवरायांची किर्ती त्यांच्या
अंगात पुन्हा सळसळते
मायबोली मराठी पुन्हा
गीत स्वराज्याचे गाते
एकच सुर निघत आहे ...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे..जय मनसे...

कोंकणी ऐरणी पुणेरी वर्हाडी
आमची हि मायबोली
क्रुष्णा कावेरी वर्धा नर्मदा
आणि ती गोदावरी
एका धारेत मिसळत आहे
हा मराठी माणुस जागत आहे....
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे...जय मनसे...

ना धर्माचा ना जातीचा
जो मानतो स्वत:ला ह्या मातीचा
जो जगतो मराठी तो मराठी
जो बोलतो मराठी तो मराठी
हा मराठी धर्म पसरत आहे ....
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे...जय मनसे...

द्म्यानदेव माऊली अन् तुकोबांच्या
अभंगात जन्मली ती मराठी
पु.लं पासुन कुसुमाग्रजांच्या
लेखनीत सजली ती मराठी
हा मराठी झेंडा फडकत आहे...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे..जय मनसे...

भिमरायांच्या त्या क्रांतीमध्ये
पेटून उठली ती मराठी
जोतिबांच्या शिकवणीमध्ये
अस्मिता जागली ती मराठी
हा मावळा मराठी पेटत आहे...
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे..जय मनसे..

एकसंग असावे एकबंध असावे
हे मराठी नाते मनोमनी रुजावे
ह्या भारतमातेच्या लेकरांमध्ये
ह्या महाराष्ट्राचे अव्वल स्थान असावे
ह्या सतिशाला हे वाटत आहे ....
हा मराठी माणुस जागत आहे
म्हणे एकासुरात सारे असे
जय मनसे...जय मनसे...


-- सतिश चौधरी

Wednesday, May 26, 2010

तुच सांग तुझ्याविना.....कसा मी राहु...

अशाच एखाद्या वळणावरती
भेट कुठेतरी…
सांज माझी सुनी सुनी
बनव तिला तु सोनेरी...

स्वप्नामध्ये माझ्या
ये तु कधीतरी…
माझी म्हणुनच ये
नको आता ती परी...

किती वाट पाहु तुझी
अन् किती नाही…
वाट चुकल्यासारखी तरी
ये माझ्या घरी...

तुझ्याविना ह्या जिवनाला
अर्थ कुठं आहे...
तुच खरी माझी
बाकी सगळं खोटं आहे

ये एकदा तरी ये आता
नको अंत पाहु...
तुच सांग तुझ्याविना
कसा मी राहु...
कसा मी राहु...

--- सतिश चौधरी

Monday, May 24, 2010

तु धरती माझी अंबर मी तुझा....

तु धरती माझी अंबर मी तुझा
सागर मी असा अर्धा अधुरा
नदी बनुनी ये माझ्या जीवनात
मी आहे अशांत तुझ्या प्रेमात
आसुसलेला हा तुझ्या प्रेमाचा....
तु धरती माझी अंबर मी तुझा…

रात्रंदिनी अशी तु राहते मनात
पायलांची झनकार घुमते कानात
डोळ्यांत बसुन उडते तु भुर्रकुन
पाखरु हे मनाचे उडे गगनात
मी पोपट हा माझ्या मैनेचा....
तु धरती माझी अंबर मी तुझा….

हे सावल्यांचे नाते आहे उन्हांत
ओठांवरती अलगद गाणे प्रेमात
तु आहे माझ्या मनात अशी
जळत्या उन्हात शितल सावली
गारवा दे मजला तुझ्या प्रितीचा...
तु धरती माझी अंबर मी तुझा….


-- सतिश चौधरी

Thursday, April 15, 2010

वाटते....!

तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी
मला प्रेमयद्य करावेसे वाटते
तुझ्या गोड हास्याच्या लहरींसंगे
मला वाहुन जावेसे वाटते....
तुझ्या मनाच्या कोण्यात हरवलेल्या
जाणीवांना पुन्हा जागवावेसे वाटते....

नको तु रुसुन बसु अशी सजनी
मनाच्या त्या काटेरी कुंपणाशी
तोडुन टाक आज बंधने सगळी
मिळुन जा नदी बनुन सागराशी
तुझ्या दगडधोंड्यांच्या मार्गामधले
सगळे अडथळे हटवुन द्यावेसे वाटते...

तुजविन अधुरा आहे खेळ सावल्यांचा
तुझ्या विरहाचे दु:ख उन्हापरी चटके
मोत्यांचे ते चमकणे खेळ शिंपल्यांचा
कोहिनुर मन माझे तुझ्यासाठी भटके
ना सावली ना शिंपले तुच माझे आपले
तुला पुन्हा आपलेसे करावेसे वाटते

----- सतिश चौधरी

Monday, March 22, 2010

स्वप्नातला गाव....!!

स्वप्नातला गाव....

स्वप्नातला गाव माझा
आज स्वप्न बनुन गेला
विसरत गेलो, विसरत चाललो
विसरुन गेलो मी त्याला...
स्वप्नांहुनही किती सुंदर
ह्या क्रुत्रिम शहरांपेक्षा
निसर्ग तेथे वास्तव्याला होता
हिरवी हिरवी गार पालवी
नदी नाल्यांची भांडणं होती
मुले ती तेथे झुला झुलवी
सकाळी सकळी मंदिरात
घंटा वाजत जायची
गाव माझा जागत होता
मंडळी भजन गायची
ते रस्ते करड्या मातीचे
खड्ड्यांचे कुठे दगडांचे
पण पावलांना आपले वाटे
मायेच्या पाऊलवाटांचे....
लोकांच्या जगण्यामध्ये
एक वेगळीच तर्हा होती
फाटके होते खिसे जरी
जगण्याची दौलत होती
त्याच माझ्या गावाला
सोडुन आलो कधीचा
नौकरीसाठी,पैशासाठी
म्हटलं कधी कधी चक्कर मारु
एकदिवस आपल्या गावाकडे
किती वर्ष निघुन गेले
पण तो दिवस आला नाही
गाव माझा बोलावतो आहे
मजला कधीचा...
तो उनाड रस्ता तसाच आहे
माझ्या बालपणीचा...
काहिच नाही बदललं अजुनही तेथे
मी मात्र बदललो...
काल स्वत:मध्ये गुंफलो होतो
आज संसारी गुंफलेलो...
माहित नाही आज तेथे
कसा काय हाल असेल...
स्वप्नांमधला गाव माझा
कदाचीत स्वनांतच दिसेल.....

-- सतिश चौधरी

Sunday, February 14, 2010

कारण वेलेंटाईन माह्यं नाव हाय.....!!

शुक शूक... बघ इकडे बघ
अोे ए हेल्लो....
काल रात्री वेलेंटाईन
माह्या सपनामंधी आला
बारा वाजले व्हते चेहर्यावरती त्याच्या
डोळ्यात व्हती एका बंपरची नशा
काय झालंरे भाऊ ..
म्या िवचारलं त्याले पाहुन
म्हणे लेका तु लयं खुश आहे
माही तं वाटच लागली
ितच ती पोट्टी पाहून...
म्हणे ह्या पेरमासाठी मी शहीद झालो
लोकांनी दगड मारले मले
तवा समजलं नाय ...िक हा काय घोळ हाय
अाता मले समजायले लागलंं
लोकं म्हणायचे अबे बयताळा
एका पोरीसाठी कोनी मरतं काय...
मी बी चायला घनचक्कर
समजलाच नाय मले तवा ह्या चक्कर
आता पस्तावुन राह्यलो मी...
चायला आजकालचे पोट्टे ...!
काय मज्जा करत्यात
दरसाली माह्या मरणावर
एका निवन पोट्टीवर मरत्यात
चायला याले म्हंते मरण
मी मेलो फुकटचा....
आता वाटते म्या भी
दरसाली एक पोट्टी पटवायची
फुलटु जगायचं...
घुमायचं िफरायच.. ़ डेटींगले जायच
एक वर्ष लॉगीन करायचं
नाही जमलं पुढ तर मंग
आजकालच्या पोट्याईपरमाने
लगेच लॉगआऊट व्हायचं
पन आता मी करु तरी काय...
आत्मा माह्या भटकत हाय...

मी तर कायमचा लॉगआऊट
झालो आहे ह्या जगातुन
तुम्ही तरी तसं नका करु....
पन् खरच सांगतो हाय
प्रेम करा िबनधास्त मनातुन...
आत्म्यातुन ... परमात्म्यातुन ....
नसेल होत तर राहु द्या
पन नका करु टाईमपास
कारन टाईम िकतीही बदलला
तरी प्रेम ...हे प्रेमच राहणार हाय
म्हणुन तर मेलो लेकोहो मी
अन् वेलेंटाईन माह्य नाव हाय....
आजच प्रेम पाहुन खरच
मले लय दु:ख होत हाय
नाही सहन करु शकत काही
म्हणुनच दारु िपऊन ...
थोडा खुश होत हाय.... ंं
पन् साली दारुभी बेइमान वाटते...
थोडीभी चढत नाय....
कारण अजुनही ...
अजुनही माह्या खर्या प्रेमाची नशा
माह््या डोळ्यात िदसत हाय...
कारण वेलेंटाईन माह्यं नाव हाय.....

--- सतीश चौधरी

Wednesday, December 30, 2009

एक पोट्टी.....

एक पोट्टी रोज माह्या
सपनामंधी येते
हिचक विचक खाता पेता
उचकी देऊन जाते
थयथय नाचे मनामंधी
मोरनी हाय जशी
येड लावुन जाते
तिचे नखरे बावनमिशी

एक दिवस अशी अचानक
माह्यासमोर आली
पाहुन मले काय सांगु
खुदकन हसुन गेली
म्या म्हनलं काय ती
हिच पोट्टी हाय
कोनबी असुदे यार
पन हिले तोड नाय

सपनामंधली पोट्टी पुन्हा
दिवसा दिसुन जाते
कं दिवसा पाह्यलेली पोट्टी
पुन्हा सपनामंधी येते
काय करु चायला
पुरता लोचा झाला
माह्या मनाच्या डुगडुगीचा
चक्का जाम झाला

एक वाटे सुंदरा मले
एक वाटे अप्सरा
चायला सपनातल्या पोट्टीचं
रुप दिवसा आठवत नाही
तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं
रुप मनी साठवत नाही
डोये खुल्ले तवा माह्या
ध्यानामंधी आलं
दिवसाढवळ्या सपन पाहुन
कोनाचं भलं झालं....

-- सतिश चौधरी